Activities 2022-23



Digital Teaching Tools

व्यवसाय शिक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा 

        मा . श्री निनाळे साहेब , सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे यांचे संकल्पनेतून  सातारा जिल्ह्यामध्ये  डिजिटल टिचिंग टूल्स या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि ०४/०१/२०२३ ते ०६/०१/२०२३ या कालावधीत करण्यात आले होते .  अहवाल पाहण्यासाठी खालील लिंक  क्लिक करा 


Click Here


Digital Teaching Tools

व्यवसाय शिक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा 

मा . श्री निनाळे साहेब , सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे यांचे संकल्पनेतून पुणे  जिल्ह्यामध्ये  डिजिटल टिचिंग टूल्स या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि ०४/०१/२०२३ ते ०६/०१/२०२३ या कालावधीत आबेदा इनामदार गर्ल्स ज्यू. कॉलेज, पुणे येथे करण्यात आले होते . या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले.   


















पुणे विभाग : शिक्षक गौरव ८ ऑक्टो २०२२

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास ,रोजगार स्वयंरोजगार व नाविण्यता विभागातील. 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, पूणे यांचेमार्फत मा. चंद्रकांतजी निनाळे साहेब,सहसंचालक यांनी नारीशक्ती सन्मान व शिक्षक गौरव सोहळा दि ०८/१०/२०२२ रोजी आयोजित केला होता. पूणे विभागातून लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षक श्री बी. एल. सुर्वे यांचा व्यवसाय अभ्यासक्रमाकडील उल्लेखनीय कामाबद्दल गौरव मा. भाऊसाहेब जाधव व मा. दिपक शिकारपूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. 


 














Workshop on  Digital Teaching tool 

 महिला सक्षमिकरण अंतर्गत   महिला शिक्षकाना Digital Teaching tool या विषयावर  तिन दिवसाची तिसरी कार्यशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था , औध पूणे येथे मा.चंद्रकांत  निनाळे साहेब,  सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय पूणे यांनी पूणे विभागासाठी (दि. २९ सप्टेंबर २०२२ ते १ आक्टो. २०२२  ) आयोजित केली होती. 

तिन्ही कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे व्यवसाय शिक्षक श्री बाळकृष्ण सुर्वे हे होते.

YouTube : By Swati Javheri















दि. १३/०८/२०२२ ः लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, सातारा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोस्तव निमित्त कौशल्यावर आधारित कार्यशाळा एल ई डी बल्ब निर्मिती चे आयोजन शास्त्र  व व्यवसाय शिक्षण  विभागामार्फत करण्यात आले. यामध्ये  ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण  केले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ आर व्ही शेजवळ हे होते. तर मा. सौ. दिक्षित मँडम , प्रशासन अधिकारी , शिक्षण संचालक(उ.शि.) पूणे ह्या प्रमुख पाहुण्या होत्या . त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले..

श्री साळुंखे एन सी  व श्री  सुर्वे बी एल. यांनी  विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ कदम एम ए यांनी  केले. क.म. शास्त्र विभाग प्रमुख प्रा. मुसळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
क.म. कला वाणिज्य विभाग प्रमुख प्रा सुनिल शिंदे यांचे विशेष सहकार्य  लाभले. कार्यक्रमास क.म. प्राध्यापक उपस्थित होते. 

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी  श्री एन जे कदम , महादेव सुतार यांचे मोलाचे सहकार्य  लाभले.




















start up Yatra : 2022




 

डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...